राज्यात दिवसभरात 3717 नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 70 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज दिवसभरात 3 हजार 717 नव्या कोरोनाबाधितांची (Coroanvirus) नोंद झाली असून, 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 हजार 83 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 93.44 टक्के आहे. तसेच, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 लाख 80 हजार 416 वर पोहचली आहे.

सध्या राज्यात 74 हजार 104 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 17 लाख 57 हजार 5 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 48 हजार 209 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 17 लाख 2 हजार 457 नमुन्यांपैकी 18 लाख 80 हजार 416 (16.7 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 12 हजार 587 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 4 हजार 403 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठी किमान तीन कंपन्यांच्या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी औषध नियंत्रकांकडून आढावा घेतला जात असतानाच, येता 6 ते 8 महिन्यात कोट्यावधी लोकांचे लसीकरण करण्याच्या मोहिमेची तयारी भारताने सुरु केली आहे. कोविड-19 लशीच्या 60 कोटी मात्रा 30 कोटी भारतीयांना देण्यासाठी आमची निवडणूक यंत्रणा तैनात करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.