…तर राज्यात पुन्हा Lockdown , मंत्री विजय वडेट्टीवारांचे स्पष्ट संकेत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याबाबत सरकार वारंवार आवाहन करूनही काही लोक नियम पार धाब्यावर बसवले आहेत. यामुळे, आता राज्य सरकार पुन्हा नाईट कर्फ्यू लावण्याच्या विचार करत आहे. लोकांनी काळजी घेतली नाही, तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

मंत्री वडेट्टीवार शनिवारी (दि. 20) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी. तसेच लग्न समारंभातील गर्दी टाळण्यासाठी आता आम्ही मंगल कार्यालयांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. शक्यतो, सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा सरकार विचार करत आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. ते कुठलीही काळजी घेताना दिसत नाहीत. यामुळे आता काही कठोर पावले उचलावी लागणार असल्याचे ते म्हणाले.