Coronavirus : चिंताजनक ! राज्यात 24 तासात 583 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 10 हजार ‘पार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गुरुवारी (दि.30) 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये एकट्या मुंबईतील 20 जणांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या 459 झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाबाधित 583 नवी रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 498 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज 180 जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 773 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 8 हजार 266 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.  आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 54 हजार 798 नमुन्यांपैकी 1 लाख 34 हजार 244 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून 10 हजार 498 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 68 हजार 266 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 10 हजार 695 लोक संस्थास्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईतील आकडा 7 हजार 61 असून आजपर्य़ंत मुंबईत कोरोनामुळे 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 20 मुंबई, पुणे शहर 3, ठाणे 2 आणि नागपूर शहर आणि रायगडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्यामध्ये 19 पुरुष तर 8 महिलांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या 22 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळून आले आहेत.