Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9181 नवे पॉझिटिव्ह तर 293 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दहा हजारांच्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 9181 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 513 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.91 टक्के इतके आहे.

देशात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असताना राज्यात देखील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 711 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 3 लाख 58 हजार 421 रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट वाढला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 68.33 टक्के इतका झाला आहे. दुसरीकडे, राज्यात कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात राज्यात 293 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या 18 हजार 050 झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 3.44 टक्के इतका आहे.

सध्या राज्यामध्ये 1 लाख 47 हजार 735 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या राज्यामध्ये तब्बल 10 लाख 01 हजार 268 जण गृहविलगीकरणात (होमक्वारंटाइन) आहेत. तर 35 हजार 521 जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन) मध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 27 लाख 73 हजार 513 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 लाख 24 हजार 513 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.