Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11813 नवे पॉझिटिव्ह तर 413 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज पहिल्यांदाच सर्वाधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 413 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात आतापर्यंत 19 हजार 063 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 11 हजार 813 नवी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 60 हजार 126 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.82 टक्के इतके आहे. राज्यात गेल्या 24 तासात 9 हजार 115 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 10 लाख 25 हजार 660 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 36 हजार 450 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 1 लाख 49 हजार 798 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 29 लाख 76 हजार 090 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 लाख 60 हजार 126 चाचण्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like