Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9601 नवे पॉझिटिव्ह तर 322 जणांचा मृत्यू, पुण्यात 46345 सक्रिय रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 9 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 9601 नवीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 31 हजार 719 एवढी झाली आहे. राज्यात अ‍ॅक्टिव्ह 1 लाख 49 हजार 214 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 46345 रुग्ण हे एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आहे. लॉकडाऊनमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली. सध्या राज्यामध्ये रुग्ण वाढीचा दर 19.66 टक्के आहे.

गेल्या 24 तासात राज्यामध्ये 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे आतापर्यंत 15 हजार 316 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून सध्या राज्याचा मृत्यूदर 3.55 टक्के इतका झाला आहे. एकिकडे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासामध्ये 10725 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61.82 टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 66 हजार 883 रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 21 लाख 94 हजार 943 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 4 लाख 31 हजार 719 चाचण्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यामध्ये 1 लाख 49 हजार 214 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या 9 लाख 8 हजार 099 लोक होम क्वारंटाईन असून 38 हजार 947 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like