Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11 हजार 277 रूग्ण झाले बरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. आज देखील राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात ११ हजार २७७ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. तर महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९१.०७ टक्के झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात १० हजारांपेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. आज दिवसभरात राज्यात ५ हजार २४६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ११७ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आजवर १७ लाख ३ हजार ४४४ कोरोना संसर्गित रुग्ण सापडले. त्यातील १५ लाख ५१ हजार २८२ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर सध्या १ लाख ६ हजार ५१९ रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण ४४ हजार ८०४ रुग्णांचा कोरोना संसर्गाने आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात आजवर तपासण्यात आलेल्या ९२ लाख ५० हजार २२४ नमुन्यांपैकी १७ लाख ३ हजार ४४४ नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १८.४२ टक्के आहे. आजघडीला राज्यात १२ लाख ५२ हजार ७५८ जण घरगुती विलगीकरणात आहेत. तर १२ हजार ३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.