Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 10906 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढू लागली आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळत आहे. गेल्या 24 तासात 10906 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असून सध्या राज्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.76 टक्के इतके झाले आहे.

राज्यात रुग्ण बरे होत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्राण वाढले आहे. गेल्या 24 तासात कोरोना महामारीमुळे 300 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 17 हजार 92 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.49 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 10483 नवीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 90 हजार 262 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.07 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 1 लाख 45 हजार 582 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 9 लाख 82 हजार 075 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 35 हजार 262 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. राज्यात आतापर्यंत 25 लाख 69 हजार 645 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 4 लाख 90 हजार 262 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.