Coronavirus : राज्यात ‘कोरोना’मुळं आतापर्यंत 100 हून अधिक पोलिसांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचे संक्रमण अधिक होत आहे. याला नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे उपाय राबविले जात आहेत. मात्र, कोरोनामुळे मृत्यूदर अधिक झाला आहे. यात पोलिस दलातील सुमारे 100 पोलिसांचाही मृत्यू झालेचे समोर आले आहे. यामुळे पोलिस दलात चिंतेचे वातवरण पसरले आहे. तर, आतापर्यंत 9 हजार 96 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 7 हजार 84 पोलिसांनी कोरोनावर मात केलीय, अशी माहिती समोर आली आहे.

कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात कोविड रुग्णालये उभारणे, कोविड सेंटर उभारणे, प्रतिबंधित क्षेत्र ठरविणे आदींचा समावेश होत आहे. या ठिकाणी बंदोबस्त करणार्‍या पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांसह महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी, अंमलदार यांना अधिक प्रमाणात कोरोनाची बाधा झालीय.

याबाबत राज्य पोलीस दलाने गुरूवारी आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार राज्यभरात 100 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात 8 अधिकार्‍यांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत 937 अधिकार्‍यांसह 8 हजार 159 असे एकूण 9 हजार 96 पोलिसांना कोरोनाची लागण झालीय. त्यापैकी 722 अधिकार्‍यांसह 6362 पोलिसांनी कोरोनावर मात केलीय.

सध्या 207 अधिकारी आणि 1705 अशा सुमारे 1 हजार 912 पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुलै महिन्यापासून पोलिसांभोवतीचा हा आकडा वाढत आहे. त्यात दिवसाला दोन ते तीन पोलिसांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहे. याअगोदर घड़लेल्या एका घटनेत कोरोनामुळे भेंडीबाजार भागातील एका पोलीस कुटुंबियाला पोलिसासह तिघांना गमाविण्याची वेळ ओढावली आहे.