आर्टिस्टनं सांगितलं कसा कराल ‘कोरोना’ मेकअप लुक ! नेटकरी ‘भडकले’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – युएईची एक मेकअप आर्टीस्ट फातिमा एलदीवान (Fatima Aldewan) सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. याचं कारण म्हणजे तिनं कोरोना व्हायरस लुक सोशल मीडीयावर शेअर केला आहे. फातिमा सोशल मीडियावर नेहमीच मेकअप टुटोरियल शेअर करत असते. परंतु यावेळी शेअर केलेलं टुटोरियल तिला महागात पडलंय असं दिसतंय.

https://www.instagram.com/p/B9Wf-mclZr1/

अलीकडेच फातिमानं तिच्या इंस्टावरून एक मेकअप टुटोरियलचा व्हिडिओ शेअर केला होता. फातिमाचं हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तिच्या या व्हिडीओला तब्बल 90 हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हजारो नेटकऱ्यांनी तिचा व्हिडीओ लाईक केला आहे. तिनं या व्हिडीओला अरेबिक भाषेत कॅप्शन दिलं होतं. ज्याचा अर्थ होतो कोरोना व्हायरस मेकअप.

https://www.instagram.com/p/B8tx-6tFu3s/

5 मिनिटांच्या व्हिडीओच दिसतं की, फातिमा आधी तोंडाला मास्क लावते आणि मेकअपला सुरुवात करते. अशा प्रकारे नंतर ती हळूहळू पूर्ण चेहऱ्याचा मेकअप करते. या व्हिडीओनंतर फातिमावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसली. अशा व्हिडीओमुळं अनेकजण तिच्यावर नाराज झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B7rNQWGFC2R/

एकानं तिच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं की, लोक यामुळं मरत आहे आणि तुला मस्करी सुचत आहे. आणखी एकानं कमेंट केली की, मेकअपमध्येही कोरोना व्हायरस. हा काय मुर्खपणा आहे.

https://www.instagram.com/p/B7YqlmCl0UB/

रिपोर्ट्सनुसार, फातिमानं हा व्हिडीओ यासाठी शेअर केला होता की, ती लोकांना सांगू शकेल की, मास्क लावूनही परफेक्ट मेकअप कसा करावा. परंतु या व्हिडीओमुळं उलट तिच्यावर टीका होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B1CbKNllsAY/

https://www.instagram.com/p/Bz2OcyPlyoj/