Lockdown : ‘फेरारी’ कारमधून फिरण्याचा ‘शौक’ महागात पडला, पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असून संसर्ग रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 हजारवर पोहोचला आहे. वारंवार सांगूनही काही जण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जात नाही. अशा लोकांना पोलीस कुठे फटके देऊन तर कुठे उठाबशा काढण्याची शिक्षा देत आहेत. असाच प्रकार इंदूरमध्ये घडला आहे. फेरारी घेऊन विनामास्क जाणार्‍या तरुणाला महागात पडले आहे. या तरुणाला पोलिसांनी अडवून मास्क का घातला नाही याची विचारणा केली. तरुण उडवा उडवीची उत्तरे देत आहे हे पाहून पोलिसांनी त्याला उठाबशा काठायची शिक्षा दिली आहे.

मध्य प्रदेशातील बडगाव इथे आतापर्यंत 60 जण कोरोनाग्रस्त आहेत. मागच्या 2 दिवसांत नवीन 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात मागच्या 24 तासांमध्ये 1990 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात 824 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 5 हजार 803 रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे. त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची खैर नसणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.