Coronavirus : 30 दिवस व्हेंटिलेटरवर, हार्ट फेल, चमत्कार झाला आणि वाचला जीव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने ग्रस्त 31 वर्षीय तरुण 30 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर चमत्कारीकरित्या बरा झाला आहे. यावेळी, तरूणाला दोनदा निमोनिया, सेप्सिस, हार्ट फेल आणि दोन वेळेस स्ट्रोकचा त्रास देखील झाला. त्याचा जीव वाचणार नाही असे देखील डॉक्टरांनी त्या तरुणाच्या पत्नीला सांगितले होते.

ही बाब ब्रिटनच्या एसेक्सची आहे. दोन मुलांचा वडील ओमर टेलर हेल्थकेअर कंपनीत प्रादेशिक संचालक आहे. कोरोनामुळे त्रस्त झाल्यानंतर त्याची प्रकृती इतकी बिकट झाली की रुग्णालयाने त्याच्या कुटुंबियांना सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले. डॉक्टरांनी ओमरला असेही सांगितले की आता तो कधीही त्याच्या पायावर चालू शकणार नाही. पण तो आपल्या पायांनी चालत हॉस्पिटलमधून बाहेर आला.

जेव्हा ओमर बरा झाल्यानंतर घरी पोहोचला तेव्हा शेजाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. त्याची 30 वर्षांची पत्नी, कॅटलिन टेलर ने सांगितले की, प्रथम आम्हाला सांगण्यात आले की त्याचा मृत्यू होणार आहे. मग असे म्हटले गेले की तो कधीही चालू शकणार नाही. त्याचे पूर्णपणे ठीक होणे हा संपूर्ण चमत्कारच आहे. कॅटलिनने सांगितले की त्याने मुलाच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या निमित्ताने घरी येण्याचे ठरविले होते आणि त्याने हे करून दाखवले. ओमरवर सुमारे 8 आठवडे उपचार चालू होता, त्यादरम्यान तो 30 दिवस व्हेंटिलेटरवर राहिला.

ओमरला डॉक्टरांनी इन्ड्यूस्ड कोमामध्ये ठेवले होते. कोम्यातून बाहेर आल्यानंतर त्याने त्याची बोलण्याची क्षमता गमावली, परंतु हळूहळू तो आता सुधारत आहे आणि काहीसे शब्द आता तो बोलू शकत आहे. त्याचा एक हातही पॅरालाइज्ड झाला आहे. डॉक्टरांना आशा आहे की सततचे उपचार करून वर्षाच्या अखेरीस तो 90 टक्क्यांपर्यंत बरा होईल.