Coronavirus : फ्रान्समधून आलेल्या युवकानं धुमधडाक्यात केलं भारतात ‘लग्न’, क्वारंटाईनमध्ये असतानाही केला हजारो लोकांना ‘टच’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरासह भारतामध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, वारंवार आवाहन करुनही नागरिकांकडून निष्काळजीपणा बाळगला जात आहे. असेच एक प्रकरण तेलंगणातून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्सहून परतलेल्या तरुणाला प्रशासनाने दोन आठवडे घरात राहण्यास सांगितले होते. पण याच काळात त्याने लग्न करुन एक हजाराहून अधिक पाहुण्यांना स्पर्श केला आहे. त्यामुळे तेलंगणामध्ये खळबळ उडाली आहे.

लग्नासाठी संबंधित तरुण हैदराबादपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या हणमकोंडा येथे पोहोचला होता.या लग्नात एक हजाराहून अधिक लोक पोहोचले होते. लग्नानंतर मोठ्या रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते. परंतु या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री कार्यालयाने रिसेप्शन त्वरित रद्द करण्यास सांगितले. या लग्नात कोण पोहोचले याचा शोध घेण्यासाठी आता प्रशासन प्रयत्न करीत आहे. सर्व पाहुण्यांचे परीक्षण केले जात आहे.

भारतात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी एका दिवसात विक्रमी 63 प्रकरणे नोंदली गेली. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या 32 परदेशी लोकांपैकी 17 जण इटालियन, फिलिपिन्समधील तीन, ब्रिटनचे दोन आणि कॅनडा, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथील प्रत्येकी एक आहेत. यात आतापर्यंत दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि महाराष्ट्रात चार जणांचा मृत्यूही झाला आहे.