मुंबईहून केरळमध्ये 18 मार्चला परतलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

वृत्तसंस्था – केरळमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रविवारी कोट्टायम जिल्ह्यात ही घटना घडली असून व्यक्तीचा मृत्यू त्यांच्याच घरी झाला आहे. 18 मार्च रोजी मुंबईहून परतल्यानंतर कुमारकोममध्ये राष्ट्रीय परमीट ट्रक चालक होम क्वारंटाईनमध्ये होता असं अधिकार्‍यांनी सांगितलं. घरामध्येच त्याला त्रास होण्यास सुरवात झाली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव शरीर मोर्चरीधमील सरकारी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पीटलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसनं भारतामधील केरळमध्ये सर्वाधिक थैमान घातलं आहे. केरळमध्ये सर्वात जास्त प्रकरणं समोर आली आहेत. भारतात सर्वप्रथम केरळमध्येच कोरोना संक्रमित प्रकरणं समोर आली होती. चीनच्या वुहान शहरातून 3 विद्यार्थी केरळमध्ये परतले होते ते कोरोना व्हायरसनं संक्रमित होते. दरम्यान, अद्यापही ते तिघे बरे आहेत.