Video : ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून तरुणाने लढवली ‘ही’ कल्पना, पाहून तुम्हीसुद्धा व्हाल ‘हैराण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना व्हायरसची रोज वाढत जाणारी आकडेवारी पहिली कि मनात भीती निर्माण होते.आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येक जण आपली काळजी वेगवेगळ्या पद्धतीनं घेत आहे. दोन फुटांचं अंतर, सॅनिटायझेशन आणि गरम पाणी पिणे याशिवाय वाफ घेत राहिल्यानं कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचं दावा व्यक्त केला जात आहे.

कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे लोक आपली काळजी घेत आहेत. बरेच दिवस घरी राहिल्यानंतर आता लोक कामावर जाऊ लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक स्वतःची खूप काळजी घेत आहेत. या सगळ्यामध्ये कोरोनाचे इन्फेक्शन देखील टाळावे लागेल. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ वायरल झाला होता त्यामध्ये एक तरुण भाजीवरील असलेल्या विषाणू आणि किटाणूंचा नाश करण्यासाठी कुकरच्या मदतीनं वाफ देताना दिसत आहे. त्यानंतर वाफ घेताना त्या तरुणाने अनोखी कल्पना शोधून काढली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला होता. या मध्ये आपण पाहू शकता कि त्या व्यक्तीने वाफ घेण्यासाठी चक्क कुकरचा उपयोग केला होता. तो कुकरच्या वॉलला त्यानं एक नळी लावून त्याद्वारे वाफ घेत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी वाफ घेणं किती महत्त्वाचं आहे ते या तरुणाच्या हरकतीवरून दिसत आहे. या तरुणाचा व्हिडीओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे.या आधीसुद्धा अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता जो कुकरच्या वाफेवर भाज्यांवरील विषाणू घालवत होता.कुकरचा वापर करून वाफ घेणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ २५ हजार लोकांनी पहिला आहे. तर १५हुन अधिक लोकांनी तो रिट्वीट केला आहे. तरुणाच्या या कल्पनेसाठी त्याला नोबल पारितोषिक द्यावे असं काही युझर्सनी कमेंट्समध्ये सांगितलं आहे.