कोरोनामुळं देशात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त पत्रकारांचा गेलाय जीव, दुसर्‍या लाटेनं तर ‘कहर’च केलाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी या फ्रंटलाईन वर्कर्सचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच देशात जेव्हा लसीकरण मोहीम सुरु झाली तेव्हा या सर्वांचे प्राधान्याने लसीकरण झाले. त्याचा चांगला परिणाम झाल्याचे पाहिला मिळाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित अशा फ्रंटलाईन वर्कर्सची संख्या कमी झाली.

पत्रकार या फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समाविष्ट नाहीत. त्यांचे लसीकरण झाले नव्हते. याचा फटका अनेक पत्रकारांना बसला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्राउंड रिपोर्टिंग करणारे पत्रकार आणि कोरोना काळातही ऑफिस जाणाऱ्या पत्रकारांना ना फ्रंटलाईन वर्कर्सचा मान देण्यात आला ना त्यांना लसीकरणात प्राथमिकता दिली गेली. परिणामी, विविध राज्यातील तब्बल 300 पेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात दररोज 3 टक्के पत्रकारांचा मृत्यू झाला. मे महिन्यात ही संख्या वाढली. दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ परसेप्शन स्टडीजच्या एका रिपोर्टनुसार, एप्रिल, 2020 पासून 16 मे, 2021 या दरम्यान एकूण 238 पत्रकारांचा मृत्यू झाला.

मे महिन्यात दररोज 4 पत्रकारांचा मृत्यू

पहिल्या लाटेत एप्रिल 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत 56 पत्रकारांचा मृत्यू झाला. मात्र, दुसऱ्या लाटेत परिस्थिती भयानक झाली. 1 एप्रिल, 2021 ते 16 मे, 2021 पर्यंत 171 पत्रकारांचा मृत्यू झाला. नेटवर्क ऑफ वूमन इन मीडियानुसार, सुमारे 300 पत्रकारांचा मृत्यू कोरोनाचा संसर्ग झाल्याने झाला.

रिपोर्टर, स्ट्रिंगर, फ्रिलान्सरचा समावेश

इन्स्टिट्यूट ऑफ परसेप्शन स्टडीजनुसार, कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्रकारांमध्ये रिपोर्टर, स्ट्रिंगर, फ्रीलान्सर, फोटो जर्नलिस्ट आणि सिनिअर जर्नालिस्टचा समावेश आहे. यामध्ये 300 पेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाला. त्यापैकी 238 पत्रकारांची ओळख पटली आहे.

उत्तर प्रदेशातील 37 पत्रकारांचा मृत्यू

उत्तर भारतात जास्त 37 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात दक्षिण भारतात तेलंगणामध्ये सर्वाधिक 39 पत्रकारांचा मृत्यू झाला. त्यानंतर दिल्लीत 30, महाराष्ट्रात 24, ओडिशामध्ये 26, मध्य प्रदेश 19 पत्रकारांना मृत्यू झाला. त्यामध्ये 82 ओळख न पटलेले पत्रकार होते.

41 ते 50 वयोगटातील पत्रकारांचा समावेश

रिपोर्टनुसार, 41 ते 50 वयोगटातील पत्रकार सर्वाधिक बाधित झाले होते. त्यातील अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हा आकडा 31 टक्के आहे. 31 ते 40 दरम्यान 15 टक्के आणि 51-60 दरम्यान 19 टक्के पत्रकार होते.

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा

प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आनंद राणा यांनी सांगितले, की ‘गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेस काउन्सिलच्या बैठकीत पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर काउन्सिल सेक्रेटरीने सर्व राज्य सरकारांना पत्र लिहिले होते. याशिवाय एप्रिलमध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी राज्य सरकारांना दुसऱ्यांदा पत्र लिहिले. त्यासाठी हरियाणाच्या मॉडलवर पत्रकारांना आरोग्य विमा काढण्याचा फॉर्म्युलाही ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये राज्य सरकार 5 लाखांपासून 20 लाखांपर्यंत हेल्थ कव्हर देते.