Coronavirus : कनिका कपूर सोबत अनेकजण पार्टीमध्ये होते, योगी सरकारच्या मंत्र्यांसह 45 लोकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांना कोरोनाची लागण झालेली नाही. जय प्रताप सिंह यांचा कोरोना व्हायरस टेस्ट रिपोर्ट आला असून त्यात चे निगेटीव असल्याचं समोर आलं आहे. आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह हे सिंगर कनिका कपूर सोबत एका पार्टीत उपस्थित होते. कनिकाला कोरोनाची लागण झाली आहे.

कनिका कपूरसोबत पार्टीत इतरही काही लोक उपस्थित होते. त्या 30 लोकांचा सॅम्पल रिपोर्ट आला आहे. सर्वांचाच रिपोर्ट निगेटीव आहे. म्हणजेच या लोकांना कोरोनाची लागण झालेली नाही. याशिवाय इतर 15 कोरोना टेस्ट रिपोर्ट आहेत जे निगेटीव आले आहेत. अशा प्रकारे एकूण 45 लोकांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव आला आहे.

या लोकांना भीती होती की, त्यांनाही कोरोनाची लागण झाली तर नसेल ना. अशात त्यांचा रिपोर्ट निगेटीव येणं ही त्यांना दिलासा देणारी बाब आहे. लंडनहून परत आल्यानंतर गायिका कनिका कपूर एका हॉटेलात मुक्कामी होती. ही माहिती समोर आल्यानंतर हॉटेल तात्पुरतं बंद ठेवण्यात आलं आहे. कोरोनाची वाढती दहशत आणि वाढता प्रसार पाहता ही खबरदारी घेण्यात आली आहे.

कनिकानं जी पार्टी अटेंड केली होती त्यात अनेक मोठी लोकं होती. यात कनिका कपूर, भाजप मंत्री दुष्यंत सिंह, त्यांची पत्नी निहारीका राजे, मुलगा विनायक सिंह जो 10 वीत आहे सोबतच उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जयप्रताप सिंह आणि त्यांची पत्नी वसुंधरा सिंह, अकबर डंपी यांचा पुतण्या आदिल अहमद आहे. जतिन प्रसाद यांची पत्नी नेहा प्रसाद आणि रामपूर नवाबच्या मुलीही होत्या.