लॉकडाऊननंतर शाळा-महाविद्यालयांमध्ये होऊ शकतात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात आजपासून अर्थव्यवस्थेचा एक मोठा हिस्सा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासोबत अनलॉक1.0 मध्ये काही भागांतील शाळा-महाविद्यालये सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी कशा पद्धतीनं शाळा आणि महाविद्यालय सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही बदल होऊ शकतात. कोणत्या पद्धती अवलंबल्या जाऊ शकतात याबद्दल जाणून घेऊया.

1. दोन सत्रात शाळा भरणा

एका वर्गात जर 40 विद्यार्थी असतील तर एकावेळी वर्गात 20 विद्यार्थी असणं आवश्यक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होऊ शकतं. पण असं केल्यानं शिक्षक आणि जागेची कमतरता भासू शकते यामुळे दोन सत्रात शाळा-महाविद्यालयं सुरु करण्यात यावीत. सकाळच्या सत्रात 20 तर दुपारच्या सत्रात 20 विद्यार्थी किंवा जागेच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थी संख्या ठरवावी.

2. ऑनलाइन-ऑफलाइन क्लासरुम

यामध्ये शक्य आहे किंवा 50 टक्के विद्यार्थी हे वर्गात तर 50 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनं शिकावं. त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे शिक्षक आणि शाळेतील भासणारी जागेची कमतरता या दोन्ही समस्या दूर होतील. सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल.

3. 6 दिवसांचा होणार आठवडा

अनेक विद्यापीठं आणि शाळांमध्ये 5 दिवसांचा आठवडा आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी 5 ऐवजी 6 दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे.

4. सम विषम संख्यांचा वापर करून नियोजन

हा फॉर्म्युला साधारण प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांना वापरण्यात येतो. पण शाळा महाविद्यालयातही वर्ग आणि एकूण अभ्यासासाठी ह्या नियमांचा अवलंब करण्याचा विचार सुरु आहे. त्यांचं नियोजन कशापद्धतीनं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5. ट्रान्सपोर्ट

बऱ्याच शाळा वाहतुकीवर मर्यादा घालण्याचाही विचार करत आहेत. अशा परिस्थितीत पालकांना आपल्या मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले जाऊ शकते. कारण लहान मुलांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे सोपे नाही. स्कूल बसमध्ये हे कठीण आहे.