Coronavirus : ‘या’ 15 देशांची ‘एकत्रित’ लोकसंख्या भारता इतकी पण कोरोनामुळं मृत्यूचं प्रमाण तब्बल 83 पटीनं जास्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहेत. जगात 50 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 3 लाखाच्या वर लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, इटली सारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जगातील 15 देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतापेक्षा या देशामधील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण हे 83 पटीने अधिक आहे. जगातील 15 देशांच्या लोकसंख्येचा विचार केला तर या देशातील लोकसंख्या ही भारताइतकी आहे. या 15 राज्यांमध्ये 36 लाख 54 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका यादीमध्ये पहिल्या क्रमांकार आहे. भारताने मात्र वेळीच उपाययोजना करून कोरोनाचा प्रसार रोखण्यात थोड्या फार प्रमाणात यश मिळवले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत लव अग्रवाल यांनी दिली आहे.

अमेरिका, रशिया, ब्राझिल, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की, इराण, पेरू, कॅनडा, सौदी अरेबिया, बेल्जियम, मॅस्किको या 15 देशांचा यामध्ये समावेश आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आत जवळपास 40 टक्क्यांवर पोहचल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधीत आरोग्य यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झाले आहे. भारतात लाखापेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे 7.1 टक्के होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण तब्बल पाचपट करण्यात भारताला यश आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये 11.42 टक्क्यावरून तिसऱ्या टप्प्यात दुपटीपेक्षा जास्त 26.59 टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते. एका लाखामागे तेथे 59 जणांचा मृत्यू झाला. भारतात हे प्रमाण एक लाख रुग्णामागे 0.2 टक्के आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तुल्याबळ असलेल्या चीनच्या दाव्यानुसार हे प्रमाण 0.3 टक्के आहे.