कौतुकास्पद ! … म्हणून काम संपल्यानंतर कोरोनाबाधितांसाठी ‘ही’ नर्स वाजवते वायोलिन (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतासह जगभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत जात आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ही एक कोटीच्यावर गेली आहे. कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करीत आहेत. अशीच एक कौतुकास्पद बाब समोर आली आहे. ती म्हणजे, ड्युटी संपल्यावर नर्स डॅमारीस सिल्व्हा हि कोरोनाग्रस्तांसाठी वायोलिन वाजवते आहे.

कोरोना योद्धे स्वतः जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. यातच एका नर्सचा व्हिडीओ आता समोर आलाय. चिलीची राजधानी सेंटियागोमधील El Pino रुग्णालयातील हा व्हिडीओ आहे. ड्युटी संपल्यानंतरही रुग्णालयात थांबून नर्स कोरोना रुग्णांसाठी वायोलिन वाजवत आहे. डॅमारीस सिल्व्हा असे या 26 वर्षीय नर्सचे नाव आहे. हि नर्स ड्युटी संपल्यावर रुग्णांना अशा पद्धतीने आनंद देते. तसेच त्यांच्यात उत्साह निर्माण करते.

रुग्णालयात सेवा केल्यानंतर संध्याकाळी ती नर्स हातात वायोलिन वाजविते. “माझ्या वायोलिनमधून मी या रुग्णांना प्रेम, थोडासा विश्वास आणि थोडी आशा देते. प्रत्येक वेळी मी हे अगदी मनापासून करते. रुग्ण जेव्हा संगीत ऐकतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ते टाळ्या वाजवून मला दादही देतात. हे पाहून खूप छान वाटतं, याचं मला समाधान मिळतं” असेही नर्सने म्हटले आहे.

नर्सचा हा वायोलिन वाजवतानाचा व्हिडीओ तसेच फोटो व्हायरल झाले आहे. याबाबत सर्वत्र तिचं भरभरून कौतुक होत आहे. याबाबतचे एका वेबसाईटने वृत्त दिले आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करताहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 558,091 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती मिळत आहे. जगात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 12,420,705 इतकी झाली आहे.