Coronavirus : रिसर्चमधून मोठा खुलासा : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण ? जाणून घ्या कितीपत असतो धोका

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना संसर्गामुळे अनेक देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. आजवर ३ कोटी ६७ लाख ५५ हजार ३३८ जणांना याची लागण झाली तर १ लाख ६६ हजार ८६० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यातच काही महिन्यांपूर्वी दोन पाळीव मांजरांना कोरोनाची लागण झाल्याचं उघकीस आलं होत. यानंतर प्राण्यांना कोरोनाची बाधा होते का ? यापासून माणसाला कितपत धोका असतो ? असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते. त्याबाबत रिसर्चमधून आता मोठा खुलासा करण्यात आला आहे.

समाज माध्यमात पाळीव प्राण्यांपासून संसर्ग होत असल्याच्या काही अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर आता श्वान आणि मांजरांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याची माहिती मिळत आहे. पाळीव प्राण्यांपासून माणसांना कोरोनाची लागण होतो याचा कोणताही पुरावा उघडकीस आला नाही. पण एका मांजरीमुळे दुसऱ्या मांजरीला मात्र संसर्ग होऊ शकतो, असे समोर आलं आहे. तसेच मांजरांमध्ये कोरोना संसर्ग विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे.

कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीचं व्हेटर्नरी मेडिसीन आणि बायोमेडिकल सायन्सेस कॉलेजमधील संशोधकांसोबत अँजेला एम. बॉस्को-लूथ, एरिन ई. हार्टविग आणि स्टेफनी एम. पोर्टर यांनी हा रिसर्च केला आहे. बॉस्को लॉथ यांनी सांगितल्यानुसार, मांजरींना नेहमी संसर्ग होत असतोच पण तो माणसाच्या लक्षात येत नाही. प्रयोगशाळेत प्रयोगासाठी संसर्गित केलेल्या मांजरींमध्ये सुद्धा लक्षणे दिसत नाही. तसेच श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग माणसांना होण्याचा धोका नसतो, असे रिसर्चमधून उघड झालं आहे. मात्र, काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं सांगितलं होत. WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी काही प्राण्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, पाळीव प्राण्यात संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं होते. प्राण्यांमुळे माणसांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होत. यामुळे काही जणांनी पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याचे धक्कादायक असे प्रकार उघडकीस आले होते.