COVID-19 : पाळीव प्राण्यांपासून ‘कोरोना’चा संसर्ग होण्याचा धोका ? WHO नं दिली ‘ही’ महत्वाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. जगातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. जगभरात कोरोनाची संख्या वाढत असताना कोरोनाचा संसर्ग पाळीव प्राण्यांपासून होत असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच याबाबत काही अफवा देखील पसरवण्यात येत आहेत. यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

जगभरात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विरुद्धच्या लसीबाबत जगभरात संशोधन सुरु आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या जगभरातील एक कोटी पेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

जगभरात प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोन पाळीव मांजरांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे प्राण्यांना कोरोनाची लागण होते का ? पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होतो का ? यासारखे अनेक प्रश्न आता लोकांना पडू लागले आहेत.

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण होण्याचा धोका अतिशय कमी आहे. WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथ यांनी काही प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, पाळीव प्राण्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितलं आहे. प्राण्यामुळे माणसांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले होते.

पाळीव प्राण्यांबाबत असलेल्या अफवेबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबबतचे वृत्त दिले आहे. नागरिक बाहेर जाताना आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन जातात. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेने नेण्यास मनाई केली होती.

जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरसचा सामना करत आहेत. जगभरातील कोट्यावधी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन लाखाहून अधिक जणांना आपले प्राण गमवावा लागला आहे. काही देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. जगभरातील कोरोना बाधिताचा आकडा 1 कोटी 15 लाख 80 हजार 119 वर पोहचला असून दुसरीकडे 65 लाख 47 हजार 935 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.