मोठा दिलासा ! ‘कोरोना’मुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल, ‘ही’ आकडेवारी सुखावणारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 3 कोटींवर गेला आहे. रुग्णांची संख्या 31,239,588 वर पोहोचली आहे. तर 9,65,065 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात देखील कोरोनाचा धोका रोज वाढत आहे. रोज 90000 हून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. अशात अनेक दिलासादायक घटनाही समोर येताना दिसत आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.

कोरोनामुक्त होणऱ्यांच्या संख्येत भारतानं अव्वल स्थान मिळवलं आहे. आरोग्य मंत्रालयानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा भारतात सर्वाधिक आहे. तब्बल 43 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. जगभरातील कोरोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारताची आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल

कोरोनामुक्त होणऱ्यांच्या संख्येत भारतानं अव्वल स्थान मिळवलं आहे. तब्बल 43 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारताची आहे. Worldometers नुसार, भारतानंतर कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत 18.70 टक्क्यांसह अमेरिकेचा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या स्थानी ब्राझील आहे. त्यांचा रिकव्हरी रेट हा 16.90 टक्के आहे. त्यानंतर रशिया आणि दक्षिण अफ्रिका आहे.