Coronavirus : आता चेहर्‍यावर ‘ही’ मशीन लावणार ‘मास्क’, व्हिडीओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 19 ऑगस्ट : सध्या जगात कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होत असून हि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाय राबविले जात आहेत. यातच प्रथम उपाय म्हणूनच मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. या मास्कसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सध्या कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. जगात कोरोनाची लागण झाल्यामुळे आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

जगातील अनेक देश कोरोना विषाणूशी लढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नका. तसेच आवश्यक असताना घराबाहेर पडत असाल तर मास्क लावा, असा सल्ला दिला जात आहे. याच दरम्यान मास्कसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक आहे. मास्क न लावल्यास दंड आकारण्यात आलाय. बाजारातही विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र, अनेकांना मास्क लावण्याचा कंटाळा येतो. मात्र, आता चेहर्‍यावर मास्क लावणारी मशीन आलीय. मशीनचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून कोरोनाच्या संकटात मास्क लावणारी मशीन महत्त्वाची मानली जात आहे.

अमेरिकेचा बास्केटबॉल खेळाडू रेक्स चेपमॅन याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ’द करिनेटर’ नावाची एक मशीन तयार केली असून ती लोकांना मास्क लावते, असे कॅप्शनही त्याने व्हिडीओला दिलंय. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मशीन समोर बसली असून काही सेकंदात मशीन मास्क हे व्यक्तीच्या दिशेने घेऊन जाते आणि त्याच्या चेहर्‍यावर लावते.

’द करिनेटर’ असे नाव या मास्क लावणार्‍या मशीनला दिले आहे. तर, एलन पॅन हे व्हिडीओमधील व्यक्तीचे नाव आहे, असे समजत आहे. मशीन कशापद्धतीने काम करते?, मास्क लावते, हे या व्हिडीओत दाखविले आहे. अनेक लोकांना हा व्हिडीओ आवडला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी तो शेअर केला असून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत.