Coronavirus : देश हादरला ! ‘कोरोना’बाधितांच्या आकडेवारीत चीनला टाकलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून कोरोनाचा फैलाव सुरु झाल्यानंतर कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा भारतात कोरोनाचे रुग्ण अधिक सापडले आहेत. भारताने कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत चीनलाही मागे टाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाचे 83072 संख्या असून चीनमध्ये 82933 रुग्ण आढळले होते.

गभरातील कोरोनाच्या परिस्थिवर लक्ष ठेवणारी वेबसाईट worldometers.info नुर चीनमध्ये दिवसभरात केवळ 4 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर भारतात केवळ महाराष्ट्रातच शुक्रवारी 1500 वर रुग्ण सापडले आहेत. तर देशात शुक्रवारी 3498 रुग्ण आढळले आहेत.

जगभरात कोरोना फैलाव वेगाने होत असताना भारतात मात्र कोरोनाच्या फैलावाचा वेग थोडा कमी आहे. असे असले तरी शुक्रवारची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. चीननंतर सुरुवातील इटली, इराण आणि नंतर संपूर्ण युरोप आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूने वेगाने थैमान घातले. आता रशियात देखील कोरोनाचे संकट गडद झाले आहे. मात्र, शुक्रवारी चीन जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या पहिल्या 10 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. या यादीत भारत 11 व्या स्थानी तर चीन 12 व्या स्थानावर आहे.

चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकेरी आकड्यामध्ये या ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे हा आकडा चार हजारांच्या आसपास पोहचत आहे. चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 4663 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात हा आकडा 2746 वर गेला आहे. एकीकडे भारतात रुग्णांची संख्या कमालीची वाढत असताना चीनमध्ये खूपच कमी रुग्ण सापडत असल्याने भारत वर तर चीन खालच्या दिशेने सरकत आहे.

पहिल्या दहामध्ये कोणते देश ?
कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक झालेल्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, ब्राझिल, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्तान आणि इराण आहेत. यानंतर भारताचा नंबर लागतो. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 14.60 लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 87 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.