दिलासादायक ! देशात रिकव्हरी रेट 64.23 %, जगभरात 1 कोटी लोक ‘कोरोना’मुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 47 हजार 704 रुग्ण सापडल्याने देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्येने 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळत असताना 654 मृत्यूही नोंदवले गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 लाख 83 हजार 157 वर पोहचला आहे. आतापर्यंत देशभरात 33 हजार 425 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

भारातीतल कोरोना रुग्णांचं रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.23 टक्के झाले आहे. तसेच देशातील 9 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. देशात 9 लाख 52 हजार 744 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 4 लाख 96 हजार 988 लोकांवर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे जगभरात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 10,231,837 जणांनी कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश या संकटाचा सामना असून कोरोनाचा उद्रेक झालेला पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखरण्यासाठी मास्क, सोशल डिस्टसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात युद्ध पातळीवर कोरोना व्हायरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे. कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरु असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. ही औषध कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहम प्रीबासल मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे.