मोठा दिलासा ! देशात आजपर्यंत तब्बल 5 लाख 53 हजार 471 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना एक दिलासादयक महिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असताना कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 28 हजार 701 रुग्ण देशात सापडले असून कोरोना बाधितांचा आकडा 8 लाखाच्या वर गेला आहे.

गेल्या 24 तास देशभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पहायला मिळाली आहे. तर देशभरात 500 मृत्यूही नोंदवण्यात आले आहेत. कोरोनाच्या संक्रमणामुळे देशभरात आतापर्यंत 23174 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 लाख 78 हजार 254 वर गेली आहे.

देशभरात कोरोना बाधित रुग्ण सापडत असून सध्या देशामध्ये 3 लाख 1 हजार 609 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची येणारी आकडेवारी धडकी भरवणारी आहे. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गेल्या चार दिवसात देशभरात तब्बल एक लाखाच्यावर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशाने कोरोना बाधित रुग्णांचा 8 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे. देशातील साडेपाच लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात तब्बल 5 लाख 53 हजार 471 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतातील कोरोना रिकव्हरी रेट 63 टक्के झाला आहे. दिलासादायक म्हणजे जगभरात भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे.