CoronaVirus : ’ही’ खास मिठाई खा आणि ‘कोरोना’शी लढा ? ‘या’ 6 गोष्टींचा केलाय विक्रेत्याने दावा

कोलकाता : कोरोनावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस शोधण्यात संशोधकांना यश आलेले नाही. लक्षणांनुसार उपचार करणे आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे, यावर सध्या भर दिला जात आहे. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खुपच कमी असल्याचे संशोधक सांगतात. दरम्यान, रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी विविध औषधे प्रभावी असल्याचे दावे सध्या केले जात आहेत. त्यातच कोलकातामधील एका मिठाई विके्रत्याने आपली मिठाई खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे.

मिठाई विक्रेत्याने दिली ही महिती

1 या खास मिठाईला संदेश असे नाव देण्यात आले आहे. ती 11 हर्ब्सपासून तयार केली आहे. ही मिठाई सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा दावा मिठाई दुकानाचे प्रमुख सुदीप मल्लिक यांनी केला आहे.

2 कोरोनाशी लढण्यासाठी लोकांची रोगप्रतिकारकशक्ती बळकट व्हावी, यासाठी ही मिठाई बनवल्याचे सांगण्यात येत आहे.

3 या मिठाईत तुळस, हळद, वेलची, जायफळ, आले, काळी मिरी, जिरे, तमालपत्र वापरण्यात आले आहे. तसेच साखर किंवा गूळाऐवजी मधाचा वापर केला आहे.

4 संदेश मिठाई ही मिष्टी दही, रसगुल्ल्याप्रमाणेच प्रसिद्ध बंगाली मिठाई आहे.

5 भारतात या औषधांचा उपयोग मसाले म्हणून केला जातो. हे हर्ब्स आजारांशी लढण्याची क्षमता देतात. याचा वापर करून खास मिठाई तयार केली आहे.

6 ही मिठाई सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. कोरोना व्हायरशी लढण्यास मदत मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.