मौलाना साद यांनी क्राईम ब्रँचला दिलं उत्तर, म्हणाले – ‘आता स्वतः क्वारंटाईनमध्ये आहे, बाकीचे प्रश्न नंतर बघू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत निजामुद्दीन परिसरात स्थित तबलिगी जमातने मरकजमध्ये नियमांचे उल्लंघन करुन गर्दी जमा करण्याचा आरोप मौलाना साद यांच्यावर आहे त्यांना आता यावर भाष्य केले आहे. मौलाना सादने गुन्हे शाखेच्या नोटीसीला उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणाले की मी सेल्फ क्वारंटाइनमध्ये आहे.

गुन्हे शाखेने मौलाना सादला 26 प्रश्न विचारले होते. याची उत्तरं मौलाना साद यांनी दिली आहेत. मौलाना सादने सांगितले की ते सध्या सेल्फ क्वारंटाइनमध्ये आहेत आणि सध्या मरकजमध्ये बंद आहेत. जेव्हा मरकज उघडेल तेव्हा बाकी प्रश्नांची उत्तर देईल.

मरकजमध्ये लोकांची गर्दी जमा केल्याप्रकरणी मौलाना सादसह 6 लोकांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु मौलाना साद अद्यापही फरार आहेत. त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरु आहेत.

2 एप्रिलला मौलाना साद यांनी आपला एक ऑडिओ जारी केला होता ज्यात सांगण्यात आले होते की ते ऑयसोलेशनमध्ये आहेत, त्यांनी आपल्या समर्थक आणि मुसलमानांना सरकारच्या आदेशाचे पालन करत गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी एका ऑडिओमध्ये मौलानाने कोरोनामुळे काहीही बिघडणार नसल्याचे सांगितले होते आणि मस्जिदित जाऊन नमाज पठन करण्यास सांगितले होते.

काय आहेत गुन्हा शाखेचे प्रश्न
गुन्हे शाखेकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये संघटनेचा पूर्ण पत्ता आणि रजिस्ट्रेशनसंबंधित माहिती, संघटनेसंबंधित कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती. ज्यात त्यांच्या घराचे नाव, मोबाइल नंबरचा देखील समावेश आहे. मरकजचे मॅनेजमेंटसंबंधित लोकांची देखील माहिती मागवण्यात आली आहे. तसेच विचारण्यात आले की लोक केव्हापासून मरकजमध्ये येत होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like