नोव्हेंबर-डिसेंबर’दरम्यानच भारतात ‘कोरोना’नं केली होती ‘टकटक’, वैज्ञानिकांनी शोधला वेगाने पसरणारा आणखी एक ‘व्हायरस’

नवी दिल्ली : भारतात जीवघेणा कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण 30 जानेवारीला केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर मार्च येता-येता जवळपास देशातील प्रत्येक राज्यात रूग्णांची संख्या समोर आली. आतापर्यंत हा अंदाज लावला जात होता की, व्हायरसचा संसर्ग फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. परंतु, आता प्रमुख संशोधकांनी दावा केला आहे की, कोरोनाने नोव्हेंबर 2019 मध्येच आपले अस्तित्व दाखवले होते. चीनशी संबंधीत या व्हायसरचा संसर्ग नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू झाला होता. याचा ’मोस्ट रिसेंट कॉमन एनसेस्टर’ (एमआरसीए) म्हणून शोध लावण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा वंशज व्हायरस 25 नोव्हेंबरपासूनच पसरत होता

देशाच्या प्रमुख रिसर्च सेंटर्सच्या संशोधकांनी अंदाज लावला आहे की, वुहानच्या नोवेल कोरोना वायरस स्ट्रेनच्या अगदी पहिल्या रूपातील व्हायरसचा (कोरोना व्हायरसचा पूर्वज व्हायरस) 11 डिसेंबर 2019 पर्यंत प्रसार होत होता. टाइम टु मोस्ट रिसेंट कॉमन एन्सेस्टर (एमआरसीए) नावाची शास्त्रीय पद्धत वापरून हा अंदाज लावण्यात आला आहे की, तेलंगाना आणि अन्य राज्यात पसरत असलेल्या व्हायरसची उत्पत्ती 25 नोव्हेंबरपासून 25 डिसेंबरदरम्यान झाली होती आणि याची सरासरी तारीख 11 डिसेंबर आहे.

संशोधकांनी भारतात शोधले कोरोनाचे आणखी एक रूप

या गोष्टीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही की, 30 जानेवारीच्या अगोदर चीनचा प्रवास करणार्‍यांद्वारे भारतात व्हायरसने प्रवेश केला होता. कारण या दरम्यान देशात कोरोना व्हायरस टेस्टची खुप कमतरता होती. तर हैद्राबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) ने व्हायरसची एक नवीन जात शोधून काढली आहे, जी सध्याच्या व्हायरसपेक्षा वेगळी आहे. संशोधकांनी यास क्लेड I/A3i नाव दिले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, क्लेड I/A3i तमिळनाडु, तेलंगाना, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मोठ्याप्रमाणात पसरत आहे. बिहार, कर्नाटक, यूपी, पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशातसुद्धा नवा स्ट्रेन पसरत आहे.

24 तासात कोरोनाच्या 9304 नव्या केस, 260 मृत्यू

देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या विक्रमी वेगाने वाढत आहे. गुरूवारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 9304 नवी प्रकरणे समोर आली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. यासोबतच देशाभरात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढून 216919 झाली आहे. तर, मागच्या 24 तासाच्या आत कोरोना व्हायरसमुळे 260 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतंचा एकुण आकडा 6075 झाला आहे.