आयुर्वेदातील 4 औषधे ‘कोरोना’च्या उपचारात आढळली परिणामकारक, जाणून घ्या त्यांची नावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुर्वेदातील चार औषधांच्या वापराने कोरोनाच्या हलक्या व मध्यम लक्षणाच्या रूग्णांवर उपचार शक्य आहे. आयुष मंत्रालयाचे दिल्ली येथील हॉस्पीटल अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे (एआयआयए) जर्नल आयु केयरमध्ये प्रकाशित एका केस स्टडीमध्ये हा दावा करण्यात आला आहे. ही औषधे आयुष क्वाथ, संशमनी वटी, फीफाट्रोल आणि लक्ष्मीविलास रस. आयु केयर जर्नलच्या ताज्या अंकात प्रकाशित रिपोर्टनुसार हा केस स्टडी एका 30 वर्षांच्या आरोग्य कर्मचार्‍याचा आहे, जो कोरोनामुळे संक्रमित होता आणि मध्यम लक्षणांचा रूग्ण होता.

दोन दिवसांच्या संसर्गानंतर त्यास भारतीय आयुर्वेद संस्थेत भरती करण्यात आले. एआयआयएच्या रोग निदान आणि विकृती विज्ञान विभागाचे डॉ. शिशिर कुमार मंडल यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या एका टीमने तिसर्‍या दिवसापासून रूग्णावर उपचार सुरू केले. त्या दिवशी तीन वेळा 10 मिली लीटर आयुष क्वाथ, दोन वेळा 250 मिग्रॅ संशमनी वटी आणि लक्ष्मीविलास रस देण्यात आला. तर फीफाट्रोलची 500 मिग्रॅची टॅबलेट दिवसात दोनवेळा देण्यात आली. चौथ्या दिवसापासूनच त्याच्या स्थितीत सुधारणा दिसून आली.

ताप, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव कमी झाली. अशाप्रकारे डोकेदुखी, अंगदुखी सुद्धा कमी झाल्याचे दिसून आले. तसेच चव जाण्याच्या स्थितीत सुद्धा सुधारणा होऊ लागली. हे उपचार सहाव्या दिवसापर्यंत सुरू ठेवले आणि सहाव्या दिवशी त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली.

फीफाट्रोल पाच प्रमुख जडी-बुटी सुदर्शन घनवटी, संजीवनी वटी, गोदांती भस्म, त्रिभुवन किर्ती रस तसेच मत्युंजय रस द्वारे तयार केली जाते. तर आठ अन्य वनस्पती तुळस, कुटकी, चिरायता, गुडुची, दारुहरिद्रा, अपामार्ग, करंज तसेच मोथाच्या अंशाचाही समावेश आहे. एमिल फार्मास्युटिकलने मोठ्या संशोधनातून हा फार्म्युला तयार केला आहे. तर आयुष क्वाथ दालचीनी, तुळस, काळीमिरी तसेच सुंठचे मिश्रण आहे. संशमनी वटीला गिलोयच्या सालीने तयार केले आहे. तर लक्ष्मीविलास रसात अभ्रक भस्माने 13 तत्व मिसळण्यात आली आहेत. या संशोधनातून स्पष्ट होते की, आयुर्वेदिक औषधांवर आणि संशोधन केले गेल्यास याचे परिणाम चांगले मिळू शकतात.