7 मे पासून सुरू होणार विदेशातून भारतीयांच्या वापसीचं महा-अभियान, खाडी देशातून येणार 1 लाख 90 हजार लोक, स्वतः द्यावं लागणार भाडं

नवी दिल्ली : वृत्तसस्था – जगभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे विविध देशांमध्ये परदेशांतील नागरिक अडकले आहेत. काही कामानिमित्त, काही पर्यटनासाठी गेले होते. मात्र, हवाई वाहतूकच बंद केल्याने या नागरिकांना परदेशातच अडकून रहावे लागले आहे. आता भारत सरकारने विमाने आणि नौदलाच्या मदतीने परदेशांमध्ये अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी पाऊल उचलले आहे.

परदेशात अडकलेल्या नागरिकांना 7 मे पासून टप्प्याटप्प्याने आणण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार विमाने आणि नौदलाच्या जहाजांद्वारे भारतीयांना मायदशी आणण्यात येणार आहे. यसाठी एक मोहिम आखण्यात आली असून भारतीय उच्चायुक्तांकडून परदेशांमध्ये अडकलेल्या नागरिकांची यादी बनवण्याच काम सुरु आहे. ही संख्या खूप मोठी असून यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे.

यापूर्वी वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सरकारी खर्चाने भारतात आणले होते. परंतु नव्या सूचनेनुसार परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वखर्चाने प्रवास करावा लागणार आहे. येत्या 7 मे पासून त्यांना आणण्यास सुरुवात केली जाणार आहे. विमाना किंवा जहाजांमध्ये बसण्याआधी प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षण नाही त्यांनाच भारतात येण्याची परवानगी दिली जाणार आहे. खाडी देशातून 1 लाख 90 हजार लोक भारतात येणार असून त्यांना स्वतः येण्याचे भाडे द्यावे लागणार आहे.