Coronavirus : सोलापूरमध्ये ‘कोरोना’चा हाहाकार ! आढळले आणखी 48 ‘पॉझिटिव्ह’, बाधितांची संख्या 264 वर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहरसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 264 वर पोहोचली आहे. आज तब्बल 48 पॉझिटिव्ह रूग्ण एका दिवसात मिळून आले आहेत. मृतांची संख्या 14 च आहे त्यात वाढ झालेली नाही.

आत्तापर्यंत एकूण 3124 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले यातील 2972 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 2708 निगेटिव्ह तर 264 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज एका दिवसात 132 अहवाल प्राप्त झाले यातील 84 अहवाल निगेटिव्ह तर 48 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूरात ही एका दिवसातील आजवरची सर्वात मोठी पॉझिटिव्ह संख्या आहे. आज 48 जणांत 29 पुरूष तर 19 महिलांचा समावेश आहे. इकडे आज केगांव केंद्रातून 148 जणांना मुदत संपल्यानं घरी सोडण्यात आलं तर रूग्णालयातून 12 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. आज 9 पोलीसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे हे बहुतेक सर्व ग्रामीण पोलीस दलातील आहेत.

आज ज्या भागातून रूग्ण मिळाले ते भाग पुढीलप्रमाणे –
संजीवनगर एमआयडीसी, गजानन नगर जुळे सोलापूर, बजरंग नगर होटगी रोड, सम्राट चौक आंबेडकर उद्यानजवळ, मंत्री चंडक पोलीस कॉलनी, रविवार पेठ, पोलीस वसाहत मुरारजी पेठ, समृध्दी हेरिटेज जुळे सोलापूर, निर्मिती टॉवर मोदी खाना, अश्विनी हॉस्पिटल ग्रामीण कुंभारी, लोकसेवा शाळेजवळ, बुधवार पेठ मिलिंद नगर, तेलंगी पाच्छा पेठ, तुळशांती नगर विडी घरकुल, सिध्दार्थ चौक कुमारस्वामी नगर, निलम नगर, मोदीखाना, गवळी वस्ती कुंभारी रोड, कुंभारी नाका, सिव्हील हॉस्पिटल कॉर्टर, मुलींचे वसतीगृह होटगी नाका, सहारा नगर मजरेवाडी, शिवाजीनगर मोदी, पाटकूल मोहोळ, धाकबाभुळगांव मोहोळ, सावळेश्वर मोहोळ येथील प्रत्येकी 1 रूग्ण मिळाला आहे तर सिध्देश्वर पेठ येथे 6 पुरूष, 2 महिला, सदर बझार लष्कर येथे 2 पुरूष, 2 महिला, शास्त्रीनगर येथे 3 पुरूष, 4 महिला, हुडको कॉलनी कुमठा नाका 1 पुरूष, 1 महिला यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 264 मध्ये 152 पुरूष तर 112 महिला आहेत. मृतांची संख्या 14 आहे तर रूग्णालयातून आत्तापर्यंत 41 जण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून हि माहिती देण्यात आली.