लवकरच येऊ शकते ‘कोरोना’ची वॅक्सीन, परंतु सर्वांनाच भासणार नाही गरज, जाणून घ्या तुम्ही कोणत्या लिस्टमध्ये

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रकोप जगभरात सुरू आहे. जगात कोरोनामुळे आतापर्यंत 1 कोटी 8 लाख 50 हजारपेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत. आणि 5 लाख 19 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनात गुंतले आहेत. ब्रिटनची ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसुद्धा यावरील वॅक्सीनसाठी रात्रंदिवस काम करत आहे. ऑक्सफोर्ड या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे मानले जाते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर आणि कोरोना महामारी तज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन बनवणे अपेक्षेप्रमाणे सोपे आहे आणि लवकरच ती लोकांसाठी उपलब्ध होईल. मात्र, सर्व लोकांना या वॅक्सीनची गरज भासणार नाही.

या लोकांनी व्हायसला घाबरू नये
गुप्ता म्हणाल्या, सामान्यपणे निरोगी लोक, जे ज्येष्ठ नाहीत, कमजोर नाहीत आणि ज्यांना कोणतेही आजार नाहीत, त्यांनी या व्हायरसला घाबरण्याचे कारण नाही. त्यांना हा फ्लूसारखा होईल.

यांना आहे वॅक्सीनची गरज
सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या, जेव्हा वॅक्सीन येईल तेव्हा ती सर्वप्रथम कमजोर आणि धोक्याला तोंड देणार्‍या लोकांसाठी वापरली जाईल. अन्य लोकांनी व्हायरसची चिंता करण्याची गरज नाही. मला वाटते की, कोरोना व्हायरस महामारी नैसर्गिकरित्या नष्ट होईल, ही इन्फ्लूएंजाप्रमाणे लोकांच्या जीवनाचा भाग होईल. यामुळे मरणार्‍यांची संख्या इन्फ्लूएंजापेक्षा कमी असेल.

लॉकडाऊन नाही तेवढा उपयोगी
लॉकडाऊनबाबत बोलताना गुप्ता म्हणाल्या, हे सावधगिरीचे पाऊल असेल, पण मोठ्या कालावधीपर्यंत व्हायरस रोखण्यासाठी हे उपयोगी नाही. काही देश लॉकडाऊन प्रभावी पद्धतीने लागू करण्यात यशस्वी झाले. परंतु, आता तेथे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ज्यास दुसरी लाट म्हटले जात आहे, ती प्रत्यक्षात पहिलीच लाट वेगवेगळ्या ठिकाणी पोहचत आहे.

या कंपनीने केले वॅक्सीनचे यशस्वी मानवी परिक्षण
जर्मन जैविक तंत्रज्ञान आणि अमेरिकन औषध कंपनी फायजरने संयुक्तपणे कोरोना व्हायरससाठी लस विकसित केली आहे. या कंपन्यांनी मानवामध्ये लशीचे यशस्वी परिक्षण केले आहे.

महामारी नष्ट करण्यासाठी, 17 कंपन्या वॅक्सीन विकसित करत आहेत, ज्यामध्ये जर्मनीची बायो इन टेक आणि फायजरची लस चांगली परिणामकारक आहे. बायो इन टेकने या वॅक्सीनचा डोस 24 स्वयंसेवकांना दिला आहे. 28 दिवसानंतर, व्हायरसने संक्रमित लोकांच्या तुलनेत त्यांच्यात कोरोना व्हायरसच्या विरूद्ध अँटीबॉडी अधिक शक्तिशाली आढळून आले. बायो-टेकचे सीईओ इगोर साहिन यांनी म्हटले की, सुरूवातीला हे स्पष्ट झाले होते की, वॅक्सीन शरीराची प्रतिकारकशक्ती वाढवू शकते.