Coronavirus Impact : MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी, 96 हजार जण चिंताग्रस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सेवा आयोग मार्फत तीन वर्षातून एकदा होणारी मोटार वाहन विभाग (RTO) ची परीक्षा येत्या १५ मार्चला घेतली जाणार आहे. मात्र कोरोनो संसर्गाचा वाढत प्रभाव लक्षात घेत. विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होत आहे.

एकट्या पुण्यात या परीक्षेसाठी ४० हजार आणि राज्यात ९६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहे. ग्रामीण भागातून भरपूर प्रमाणात विद्यार्थी पुण्यात आणि इतर ठिकाणच्या शहरातील परीक्षा केंद्रावर येऊ शकतात. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी पुण्यात आलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला नकळत कोरोनोचा संसर्ग झाला आणि परत तो आपल्या गावाकडे गेला तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत असून राज्य सेवा आयोगा मार्फत होणारी मोटार वाहन विभाग (RTO) ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसाय संकटात
कोरोनोमुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर मोठे संकट असून, चिकन अंडी खाल्याने कोरोनोची लागण होते असे चुकीचे मेसेज फेसबुक, व्हाॅटस ॲपवरती या सोशल माध्यमात फिरल्यामुळे त्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झालाय.शेतीला पर्याय म्हणून शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करतात.मात्र कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन शेड उभारले पिल्ले जगवली पण कोरोनाची एक चुकीची पोस्ट व्हायरल झाली व शेतकऱ्यांच आयुष्य उध्वस्त केले, हातातोंडाशी आलेला घास कोरोनोने हिरावून घेतला.

एकट्या अहमदनगर जिल्ह्याला ६०० कोटींचा फटका
अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यात २०० पेक्षा जास्त कुक्कुटपालन व्यवसाय आहे. त्यात एक कोटी बारा लाख पक्षी असून, एका पक्षाचा ७० रुपये बाजार भाव अवघ्या ७ रुपयांवर आलाय. यामुळे जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायला तब्ब्ल ६०० कोटींचा फटका बसलाय. त्यामुळे एखाद्याची एक चूक अनेकांचं आयुष्य कसे उध्वस्त करू शकते त्यामुळे कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करताना विचार करून करणं गरजेचं आहे. असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं.