Coronavirus : सोशल डिस्टेंसिंगवरून मुंबई पोलिसांनी जनतेला बनवलं ‘एप्रिल फूल’ ! अभिनेता हृतिक रोशननं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया


पोलीसनामा ऑनलाईन :
कोरोना व्हायसरच्या हाहाकारानंतर आता केंद्र आणि राज्य सरकारपासून तर डॉक्टर, पोलीस सर्वजण सोशल डिस्टेंसिंगसाठी लोकांना अपील करत आहेत. सर्वजण लोकांना घरातच राहण्यासाठी सांगत आहेत. याच दरम्यान मुंबई पोलिसांनी एक ट्विट केलं आहे जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटला इम्प्रेस होऊन बॉलिवूड स्टार हृतिक रोशन यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई पोलिसांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी एक फोटो शेअर करत लिहिलं की, “झूम करा आमच्याकडे एक सिक्रेट मेसेज आहे. फोटो झूम केल्यानंतर यावर लिहिलेलं दिसतं की, एवढ्या जवळ नाही. मुर्ख बनू नका. सोशल डिस्टेंसिंग कायम ठेवा.” अभिनेता हृतिक रोशनला हे खूप आवडलं. त्यानं या ट्विटला रिट्विट केलं आहे. हृतिकनं लिहिलं की, “खूप नाविन्यपूर्ण @मुंबई पोलीस. हे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, गंभीर समस्यांनादेखील वेगळ्या पद्धतीनं निपटवलं जाऊ शकतं.” सध्या हे ट्विट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या ट्विटवर इतरही अनेक नेटकरी आपापली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात मुंबई पोलीस आता वेगळ्या पद्धतीनं लोकांना सोशल डिस्टेंसिंगसाठी अपील करताना दिसत आहेत. पोलीस लोकांना जागरूक करतानाही दिसत आहेत.