Coronavirus : मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 969 नवे पॉझिटिव्ह तर 70 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्याची राजधानी मुंबईत कोरोना प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासामध्ये 969 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 70 जणांना आपले प्राण गमवावा लागला आहे. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोना बाधितांची संख्या लाखाच्या जवळ पोहचली आहे. मुंबईतील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत.

 

https://twitter.com/mybmc/status/1283046821741371393
मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 94 हजार 863 इतकी झाली असून 5402 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1011 रुग्ण बरे झाले असून आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत 66 हजार 633 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये 22828 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यात 6741 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 665 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10695 एवढी झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 4500 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 1 लाख 49 हजार 007 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत.