COVID-19 : ‘कोरोना’ व्हायरस रूप बदलतंय का ? ज्यामुळं वॅक्सीन होवू शकते निष्क्रिय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी विविध देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसचं थैमान जसजसं वाढत चाललं आहे. तसतसं कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे कोरोना व्हायरस आपलं स्वरुप बदलत आहे. कोरोना व्हायरसमध्ये कोणत्या प्रकारचे अनुवांशिक बदल होत आहेत. याबाबत शास्त्र शोध घेत आहेत. दरम्यान व्हायरसबाबत एक माहिती समोर येत आहे.

npr. org मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसचे बदलते स्वरुप पाहिले आहे. हा बदल जास्त प्रमाणात झालेला नाही की त्यामुळे लस निष्क्रिय ठरू शकते की नाही याबाबत साशंकता आहे. स्विट्जरलँडच्या बसेल युनिव्हरर्सिटीमधील एम्मा हॉटक्रॉफ्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमध्ये ज्या प्रकारचे म्यूटेशन होत आहे, ते पाहता घाबरण्यासारखं काहीही नाही.

जॉन्स हॉपकिन्स अल्पाइड फिजिक्स लॅपचे पीटर थीलेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना व्हायरसमुळे होणारे म्युटेशन कमी प्रमाणात आहे. व्हायरसचे 47 हजार जिनोम्स इंटरनॅशनल डेटाबेसमध्ये स्टोर करण्यात आले आहेत. जिमोन्सच्या अभ्यासावरून व्हायरसमध्ये कशाप्रकारे संख्येत वाढ होते. याचा अंदाज येतो. कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
एम्मा हॉडक्रॉफ्ट सांगतात की, सध्या कोरोना व्हायरसवर कोणतीही लस मिळालेली नाही. लस एकदा तयार केल्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा अपडेट करावी लागेल. म्हणजे मुल लसीच्या स्वरुपात बदल करावे लागतील. तरीसुद्धा याबाबत तज्ज्ञांनी निश्चित मत दिलेले नाही.