Coronavirus : ‘कोरना’च्या युद्धात पुढं सरसावले नाना पाटेकर, केली ‘एवढ्या’ लाखांची मदत ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन : देशभरात 1251 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 32 लोकांचा यामुळं मृत्यू झाला आहे. सर्व भारतीय मिळून सध्या कोरनाची लढाई लढत आहेत. सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आता प्रत्येकजण पुढे येताना दिसत आहे. पीएम केअर्स फंडात जो तो आपापल्या पद्धतनीनं डोनेट करताना दिसत आहे. या यादीत आता अभिनेता नाना पाटेकर यांचंही नाव समाविष्ट झालं आहे.

आतापर्यंत अनेक स्टार्स, कलाकार आणि नेते मंडळींनी पीएम केअर्स फंडात आपापल्या पद्धतीनं योगदान दिलं आहे. नाना पाटेकरांनीही आता आपल्या योगदानाची घोषणा केली आहे. नानांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी सर्वांसाठी एक खास मेसेज दिला आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केलं आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत नाना पाटेकर म्हणतात, “मला असं वाटतं की, सद्य स्थितीत आपण आपली जात, धर्म सगळं काही विसरून सरकारची मदत करायला हवी. आपण आपली जबाबदारी उचलायला हवी. पीएम आणि सीएम फंडात नाम फाऊंडेशनकडून 50-50 लाखांचे दोन चेक पाठवले जातील. मला विश्वास आहे की, तुम्हीही तुमची जबाबदारी उचलाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घरातून बाहेर येऊ नका. या काळात घरात राहणं देशासाठी खूप मोठी मदत आहे.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like