Coronavirus : ‘कोरोना’च्या भीतीनं शहरातून घराकडे जाणाऱ्यांना PM मोदींनी केली ‘ही’ विनंती

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या भीतीमुळे शहरांमध्ये राहणाऱ्या तरुणांनी आता घराची वाट धरली आहे. नवी दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये रोजगारासाठी इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर तरुण आलेले आहेत. कोरोनाचं सावट आणि लॉकडाऊनची भीती यामुळे त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराकडे जाणाऱ्या सर्वांना प्रवास न करता ज्या शहरांमध्ये आहात तिथेच थांबण्याची विनंती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे. माझी सर्वांना प्रार्थना आहे की, तुम्ही ज्या शहरात त्याच शहरात रहा. आपण कोरोनाला रोखू शकतो. रेल्वे स्थानके, बस स्थानकांवर गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशी खेळ करत आहोत. कृपया तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी करा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

शहरांमध्ये शट डाऊन केल्याने लोकांना गावाकडे जाण्याचा पर्याय स्विकारला आहे. त्यामुळे कोरोना देशभरात पसरण्याचा धोका मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण शहरे सोडून त्यांच्या गावी परतत जात आहेत. गर्दीमध्ये प्रवास करून काय साध्य होणार आहे. उलट धोका आणखी वाढेल. तुम्ही जिथे जाताय तेथील लोकांनाही कोरनाची लागण होऊ शकते. तुम्ही गावात आणि कुटुंबाची संकटे वाढविणार आहेत, असा इशारा मोदींनी दिला आहे.