Coronavirus : नोटांनी नाक साफ करणार्‍याला नाशिकमध्ये अटक, बनवला होता TikTok व्हिडीओ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसला अल्लाहचा चमत्कार सांगून नोटांनी नाक साफ करतानाच व्हिडिओ बनवणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. नाशिक पोलिसांनी या व्यक्तीची ओळख केली असून गुरुवारी त्याला अटक केले आहे. नाशिक पोलिसांनी स्वतः ट्विट करत या घटनेची माहिती दिली.

नाशिकमधील एका ३८ वर्षीय व्यक्तीला हा व्हिडिओ अपलोड करण्याच्या आरोपात अटक केले गेले आहे, ज्यात तो नोटांना चाटत आहे आणि त्याने नाक साफ करताना दिसत आहे.

नाशिक पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, नाशिक ग्रामीण पोलिसांकडून (महाराष्ट्र ग्रामीण) आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली गेली आहे आणि तो पोलीस कोठडीत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सय्यद जमील बाबूला मालेगावमध्ये रमजानपुरा पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, व्यक्तीने व्हिडिओमध्ये असेही म्हटले की महामारी आणखी वाढली आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आम्ही त्याला अटक केले. अधिकाऱ्याने हेही सांगितले की, दरम्यान या आरोपीस मालेगावच्या न्यायालयाने ७ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like