तणाव दूर करा ! ‘होम डिलिव्हरी’-‘हेल्पलाईन’सह ‘या’ 10 गोष्टी लॉकडाऊनमध्ये करतील तुम्हाला मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येकजण त्यांच्या घरात बंद आहे. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आणि लोकांना सांगितले की, घरात बसा कारण गर्दीत कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होतो, म्हणून सरकारने केलेले हे लॉकडाऊन कोणत्याही मोठ्या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी आहे.

सध्या लोकांमध्ये ही चिंता आहे की, ते 21 दिवस घरात कसं काय राहू शकतील, अशा परिस्थितीत कोरोना रोगाचा सामना करण्यासाठी, आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत, जेणेकरून येत्या 21 दिवसांत कोणतीही अडचण येणार नाही.

1. कोरोनाबद्दल कोणत्याही प्रकारची अफवा टाळण्यासाठी सरकारने +91 9013151515 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केला आहेत. यावर संदेश देऊन, आपण अचूक माहिती मिळवू शकाल, म्हणून कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची गरज नाही.

2. आपल्याला पुढील 21 दिवस कसे आणि काय खावे याबद्दल काळजी वाटत असल्यास घाबरू नका, कारण या लॉकडाऊन दरम्यान सर्व प्रकारच्या वस्तूंची दुकाने चालू असतील. म्हणजेच, आपल्याकडे डाळ-तांदूळ-पीठ-दूध-भाजीपाला आणि औषधाची कमतरता येणार नाही. मात्र, वेळोवेळी प्रशासनाकडून काही वेळ निश्चित केली जात आहे.

3. भाजी-दूध व औषधांची होम डिलीव्हरी करण्यासाठी काही राज्य सरकार प्रयत्न करत आहेत, त्यामुळे लोकांना बाहेर पडावे लागणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात होम डिलिव्हरीसाठी 10 हजार वाहने व्यवस्थापित करण्याची चर्चा केली आहे.

4. प्रश्न असा आहे की, आपण घरी बसून कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहू शकता. अशा परिस्थितीत कोरोना एखाद्याच्या संपर्कात येण्यामुळेच पसरतो आणि आपण घरात राहिल्यास याची शक्यता कमीच होते. या व्यतिरिक्त, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या उपाययोजनांचे पालन, वारंवार हात धुणे, शिंकण्यापूर्वी तोंड झाकणे अशा गोष्टीचें पालन केल्यावर तुम्ही आजारापासून स्वतःला वाचवू शकता.

5. जर आपणास असे वाटत असेल की, आपल्या आसपास असलेले व्यक्ती परदेशातून आले आहे तर त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका असू शकतो. म्हणून कोरोना संबंधित प्रकरणांसाठी सरकारने आपत्कालीन क्रमांक जारी केला असून 24 तासात कधीही या नंबरवर संपर्क साधला जाऊ शकतो.

6. जे लोक आपल्या घरांपासून दूर शहरात काम करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी ही वेळ खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत अनेक सरकारे, प्रशासन आणि खासगी स्वयंसेवी संस्था देशाच्या विविध भागात व्यवस्था करीत आहेत, अशा परिस्थितीत ते तुम्हाला मदत करू शकतात. दिल्लीमध्ये शासकीय निवारामध्ये मोफत खाण्याची व्यवस्था केली गेली आहे.

7. काम करणाऱ्या लोकांसाठी 21 दिवसांसाठी घरी राहून 24 तास राहणे फारच कमी आहे. अशा परिस्थितीत, लोकांना आपल्या कुटुंबासह आणि मुलांसमवेत वेळ घालवण्याची चांगली संधी आहे. यादरम्यान, अनेक प्रकारचे खेळ खेळत रहा, जेणेकरून कुटुंबात कोणत्याही प्रकारचे तणाव येणार नाही.

8. प्रत्येक वेळी दिवाळी, होळी किंवा इतर सणांच्या वेळी लोक साफ सफाई करतात. परंतु यावेळी आपण आपल्या घरी राहून स्वत: ला व्यस्त ठेवण्यासाठी काहीतरी करत रहा. अशा परिस्थितीत आपले घर स्वच्छ करणे चांगले आहे, जेणेकरून आपले आरोग्य देखील चांगले राहू शकेन.

9. घरी राहून आपण त्या सर्व जुन्या मित्रांशी बोलू शकता, ज्यांच्याशी आपण कामात व्यस्त असल्यामुळे संपर्क साधू शकला नाही. मित्रांना कॉल करा, स्वत: ला व्यस्त ठेवा आणि आपल्या मित्राला नैराश्यात येण्यापासून वाचवा.

10. स्वत: ला व्यस्त ठेवण्यासाठी आपण पुस्तके वाचू शकता, नेटफ्लिक्स-प्राइम सारख्या प्लॅटफॉर्मवर काही उत्कृष्ट चित्रपट पाहू शकता. आणि कोरोनाशी संबंधित अपडेटसाठी बातम्या ही वाचू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like