Coronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल दुष्परिणाम; WHO आणि AIIMS ने केला सर्वे, जाणून घ्या निष्कर्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती प्रभाव पडेल याबाबत संशोधन जारी आहे. तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचे वेगवेगळे दावे सुद्धा समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि AIIMS चे सर्वेक्षण समोर आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने या सर्वेक्षणाच्या संदर्भाने म्हटले आहे की, कोरोनाच्या संभाव्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर जास्त प्रभाव पडण्याची शक्यता नाही… coronavirus | national third wave of coronavirus unlikely to affect children much as per who aiims survey

वृत्तसंस्था एएनआयच्या रिपोर्टनुसार, डब्ल्यूएचओ आणि एम्सद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळले की, कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेत मुले जास्त प्रभावित होण्याची शक्यता कमी आहे. सर्वेमध्ये प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये सार्स-सीओव्ही-2 चा सीरो पॉझिटिव्हिटी रेट जास्त होता. हे सर्वेक्षण देशातील पाच राज्यांमध्ये करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 10 हजार नमूने घेण्यात आले होते.

तरी सुद्धा सरकार तिसर्‍या लाटेबाबत सतर्क झाले आहे. सरकारने मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या प्रौढ रूग्णांच्या उपचारात उपयोगी येणारे आयव्हरमेक्टिन, हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, फॅव्हिपिराविर सारखी औषधे आणि डाक्सीसायक्लिन आणि एजिथ्रोमायसिन सारखी अँटीबायोटिक औषधे मुलांच्या उपचारासाठी जास्त योग्य नाहीत. सरकारने मुलांमध्ये संसर्गाचे आकडे जमा करण्यासाठी राष्ट्रीय नोंदणीची शिफारस सुद्धा केली आहे.

सरकारचे म्हणणे आहे की, मुलांची योग्य देखभाल करण्यासाठी आरोग्य (Health) अधिकार्‍यांनी क्षमता वाढवण्याचे काम सुरू केले पाहिजे.
मुलांच्या दवाखान्यात कोरोना संक्रमित मुलांसाठी वेगळ्या बेडची व्यवस्था केली पाहिजे.
सरकारकडून जारी गाईड लाईनमध्ये हे सुद्धा म्हटले आहे की.
कोविड हॉस्पिटलमध्ये मुलांच्या देखभालीसाठी वेगळा विभाग बनवला पाहिजे जिथे मुलांसह त्यांच्या आई-वडीलांना येण्या-जाण्याची परवानगी असावी.

Wab Title :- coronavirus | national third wave of coronavirus unlikely to affect children much as per who aiims survey

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत