‘कोरोना’चा नवा हल्ला, डेंग्यू प्रमाणे रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी करतोय ‘व्हायरस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूचे संक्रमण दररोज वाढत असताना, कोरोना विषाणूच्या बदलांमुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. प्लेटलेट्स सामान्यत: डेंग्यू फिव्हरमध्ये कमी होताना दिसून येत होते, परंतु आता कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसू लागली आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेल्या पेशंटची प्लेटलेटची संख्या 20 हजारांपेक्षा कमी खाली येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा जेव्हा रुग्णाची डेंग्यूची तपासणी केली जाते तेव्हा डेंग्यूची लक्षणे नसतात.

पीजीआय लखनऊचे प्रोफेसर अनुपम वर्मा म्हणाले की कोरोना रूग्णांमध्ये डेंग्यूसदृश लक्षणे दिसणे ही फार चिंतेची बाब आहे. ते म्हणाले की, अचानक प्लेटलेट्सची संख्या रूग्णात कमी पडण्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे खूप कठीण होत आहे.

तपासणीत असे दिसून आले आहे की कोरोना रुग्णाच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम करते, मोनोसाइड्स आणि मॅक्रोफेजेस सेलवर हल्ला करतात. यामुळे प्लेटलेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया मात्र तुलनेने कमी होते. म्हणूनच रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या अचानक घटते.

अशा रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना प्लेटलेट्स देण्यात येत आहेत. अशा रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देखील दिली जाणे आवश्यक आहे. डॉ. अनुपम म्हणाले की कोरोनामध्ये असा बदल दिसून आला आहे. पूर्वी कोरोना रुग्णांना थ्रोम्बोसिस होता. यात, रुग्णाच्या रक्तात गुठळ्या तयार होतात, ज्यासाठी त्याला टीपीए इंजेक्शन देण्यात आले. यामुळे गुठळ्या विरघळल्या. परंतु, रुग्णांना बर्‍याच वेळा टीपीए दिल्यावर त्यांच्या नसा फाटत आहेत.