Coronavirus : लहान मुलांसाठी जास्त धोकादायक आहे कोरोनाचा नवीन स्ट्रेन; ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

नवी दिल्ली: वृत्तसंस्था- कोरोना संसर्ग भारतात तीव्र गतीने पसरत आहे. ताज्या अहवालानुसार, आता दिवसभरात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २ लाखांवर गेली आहे. यापैकी अनेक मुले कोरोनाच्या विळख्यात आली आहेत, ज्यांचे वय फार कमी आहे. दिल्लीमध्ये एकूण ५ अशा मुलांचा शोध लागला आहे, ज्यांचे वय ८ ते १२ महिन्यांचे आहेत. आतापर्यंत असे मानले जात होते की कोरोना संसर्ग मुलांपर्यंत पोहोचला नाही आणि त्यांना कमी नुकसान देतो. परंतू नवीन माहितीनुसार, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये लहान मुलांना धोका पोहचविण्याची क्षमता आहे.

जेष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलांना ताप, खोकला, अतिसाराची तक्रार असल्यास त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ही कोरोनाची लक्षणे असू शकतात आणि आपल्या मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शकता असू शकते. असे झाल्यास घाबरू नका आणि कोरोनाची चाचणी करून घ्या. कोरोना संक्रमित मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत-

जर तुमच्या मुलाला अतिसार, उलट्या, ओटीपोटात वेदना आणि उच्च ताप, श्वास घेण्यात अडचण, सौम्य खोकला, थकवा यासारख्या तक्रारी असल्यास ही कोरोनाची लक्षणे असू शकतात. कोरोना संक्रमित मुलांमध्ये भूक न लागणे आणि चव कमी होणे या लक्षणांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, फुफुस आणि मूत्रपिंडावर होणारा परिणाम मुलांमध्ये मल्टी-इंफ्लेमेटरी सिंड्रोमच्या तक्रारी सापडल्या आहेत.

दिल्ली- एनसीआरमधील कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत, कारण ८ महिन्यांच्या मुलाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर असा सल्ला देतात की जर आपल्या मुलांना ताप, खोकला अथवा अतिसार अशी लक्षणे दिसली तर सामान्य उपचाराबरोबरच कोरोनाची चाचणी करून घ्या. जर मुलाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी सतत तपासात रहा आणि यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधत रहा.

मुलांमध्ये होणारा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्यांना वृद्धांपासून दूर ठेवा. तसेच बाहेर गेलेल्या घरातील सदस्यांपासून दूर ठेवा. याव्यतिरिक्त, जर मुलाला संसर्ग झाल्याचे दिसल्यास त्याला अँटी-व्हायरल औषधे देऊ नका. या औषधांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत वैद्यकीय सल्ल्यानुसार कोणतेही औषध घ्या. हे लक्षात ठेवा की कोरोनापूर्वीचे जग आता नाही आहे.