सावधान ! ‘ही’ 4 राज्ये बनू शकतात ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’, बिहारमध्ये सर्वाधिक ‘धोका’

पोलिसनामा ऑनलाइन: कोरोनाचा कहर देशात चांगलाच वाढताना दिसत आहे. सध्या भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 14 लाखाच्या वर गेला आहे. गेल्या 4 दिवसांपासून प्रतिदिन 45 हजारांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. तसं तर संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरू आहे पण हे नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण बिहार, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त आहे. आता ही राज्ये देशातील हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचे आकडे आणि तज्ज्ञांची मते पाहता वरील चार राज्यांत काही दिवसात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू शकतात. कुठेही हॉटस्पॉट करण्याची तीन कारणे असतात वाढते रुग्ण, वाढणारा पॉझिटीव्ह दर आणि 10 लाख लोकसंख्येमागे कमी टेस्ट. या सर्व गोष्टी मागील काही दिवसांपूर्वी दिल्ली, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात पाहायला भेटल्या होत्या. याकाळात येथील रुग्णवाढीचा दर ही मोठा वाढत होता. आता इथं रुग्ण कमी होत आहेत पण बाकीच्या राज्यात हॉटस्पॉट करण्याची परिस्थिती उद्भवली आहे.

देशातील कोरोनाच्या रुग्णांचा दर दुप्पट होण्याचा पहिला तर तो सध्या 19.3 दिवस आहे. यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून इथं 5.5 दिवसातच रुग्ण दुप्पट होत आहेत. त्यानंतर आंध्रप्रदेशचा दुपटीचा दर पहिला 13.2 होता जो आता 6.2 दिवसावर आला आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर अनुक्रमे 8.5 आणि 14.9 आहे. एक महिन्यापूर्वी बिहारचा दुपटीचा दर हा 28 दिवस होता.

भारतात सध्या टेस्टचं प्रमाणही वाढत आहे. सध्या भारतात 10 लाख लोकसंख्येमागे 12222 टेस्ट होत आहेत. राज्यांचा विचार केला तर यात आंध्रप्रदेश आघाडीवर आहे. इथं 10 लाख लोकसंख्येमागे 30556 टेस्ट होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकात 17375 टेस्ट होत आहेत. यात बिहारची अवस्था सर्वात खराब आहे. बिहारमध्ये प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 3699 टेस्ट होत आहेत. झारखंड (6775), उत्तर प्रदेश (7834), बंगाल (8143), मध्य प्रदेश(8323) ही राज्ये टेस्ट बाबत सर्वात तळाला आहेत.