पुण्यातून आलेल्या रिपोर्टने गुजरातचं टेन्शन वाढवलं, जाणून घ्या काय आहे प्रकरण

अहमदाबाद : वृत्तसंस्था –  इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण आहे. इंग्लंडहून भारतात आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आता इंग्लंडहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशांपैकी काही जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून भारतात नव्या कोरोनाचा धोका वाढत आहे. चार प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असल्यानं प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या या चारही रुग्णांवर SVP रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इंग्लंडहून 23 डिसेंबरला 175 प्रवासी अहमदाबादला आले होते.त्यापैकी चार रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे, असा खुलासा पुण्यातील वायरोलॉजी रिपोर्टमधून करण्यात आला आहे. अद्याप 6 रुग्णांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. लंडन ते अहमदाबादला आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झाले आहे.

भारतात झपाट्याने पसरतोय नवा कोरोना

भारतामध्ये नवा कोरोना झपाट्याने पसरत आहे, 30 डिसेंबर पर्यंत 20 रुग्णांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा (New Covid -19 strain) आता भारतात देखील झपाट्याने पसरू लागला आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या 20 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे दिल्लीतील आहेत.

2 वर्षाच्या मुलाला संसर्ग

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये दोन वर्षाच्या मुलीला मंगळवारी नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झालं होतं. ब्रिटनमधून आलेल्या सर्व नागरिकांची जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) च्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे.