Coronavirus Study : चीनमध्ये ‘कोरोना’बाबत आश्चर्यकारक खुलासा ! मांजरींच्या शरीरात सुद्धा तयार झाली अँटीबॉडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसवरील रिसर्चवर दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता प्राण्यांबाबत मोठा खुलासा झाला आहे. चीनच्या वुहानमध्ये नुकतेच एका अभ्यासात आढळून आले की, सुरूवातीच्या अंदाजाच्या तुलनेत मांजरींमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे जास्त आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हुआझोंग कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी वुहानमध्ये जानेवारीपासून मार्च 2020 च्या दरम्यान 102 मांजरीच्या रक्ताचे नमुणे आणि अन्य नमूणे तपासणीसाठी घेतले होते, ज्यामध्ये आर्श्चकारक खुलासा झाला आहे. जेथून जगभरात कोरोना व्हायरस पसरला ते ठिकाणसुद्धा वुहानच आहे. जाणून घेवूयात या नव्या अभ्यासाबाबत…

मांजरींशी संबंधित हा नवा अभ्यास इमर्जिंग मायक्रोब्स अँड इन्फेक्शन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधनात आढळले की, 15 मांजरींच्या रक्तात अँटीबॉडी (रोग प्रतिकारशक्ती) अस्तित्वात होती, परंतु त्यापैकी कोणतीही मांजर संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले नव्हते आणि त्यांच्या कोरोनाची लक्षणे सुद्धा नव्हती. सर्वात विशेष बाब म्हणजे त्यापैकी एकाही मांजरीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.

संशोधकांनी सांगितले की, ज्या 102 मांजरींच्या नमुणे संशोधनासाठी घेतले होते, त्यापैकी तीन जनावरांच्या केंद्रातून सोडलेल्या 46 मांजरी होत्या, पाच पशु हॉस्पीटलच्या 41 आणि 15 मांजरी कोरोना संक्रमित कुटुंबातील होत्या. त्यांच्यानुसार, यापैकी तीन मांजरी अशा होत्या, ज्यांच्या शरीरात उच्च स्तरावर अँटीबॉडी होती आणि या मांजरी कोरोना पीडितांच्या संरक्षणात होत्या.

या संशोधनाचे नेतृत्व करणार्‍या मेलिन जिन यांच्यानुसार, मात्र, बेवारस मांजरींमध्ये कोरोनाचा संसर्ग कसा पसरला, हे ठामपणे सांगता येत नाही. परंतु हा अंदाज लावता येतो की, त्यांच्यात संसर्गाची शक्यता कोरोना प्रदूषित वातावरण किंवा मांजरींना अन्न देणार्‍या संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने झालेले असू शकते.

संशोधनकर्त्यांनुसार, मांजरी अन्य मांजरींकडून संक्रमित झाल्याचे संकत सुद्धा मिळाले आहेत. मात्र, मेलिन जिन यांचे म्हणणे आहे की, मांजरी माणसांकडून संक्रमित झाल्याचे अजूनपर्यंत कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. मांजरींसह कुत्र्यांपासून सुद्धा योग्य अंतर राखण्याच्या नियमावर जरूर विचार केला जाऊ शकतो.