पाणी येणं, गुलाबी होणं, डोळ्यांसंबंधित ‘हे’ 4 लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा, असू शकतात ‘कोरोना’चे संकेत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याची लक्षणेही बदलत आहेत. आतपर्यंत खोकला, ताप आणि श्वास घेण्यास अडचण येणे ही कोरोना विषाणूची सामान्य लक्षणे आहेत. त्यात आता एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे की, डोळ्यांचे गुलाबी दिसणेही या साथीचे मुख्य लक्षण असू शकते. अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेने चव आणि गंध ओळखण्यास अक्षम असणे यासारख्या लक्षणांचा प्राथमिक लक्षणांत समावेश केला आहे.

डोळ्यांशी संबंधित ही 4 लक्षणे कोरोनाचे संकेत
‘कॅनेडियन जर्नल ऑफ ऑप्थल्मोलॉजी’ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कंजक्टिव्हस (कंजक्टिव्हसमध्ये सूज आणि डोळे गुलाबी होणे) तसेच केराटोकंक्टिवाइटिस (कॉर्निया किंवा कंजक्टिव्हसमध्ये सूज आणि डोळे लाल होणे) देखील कोविड -19 ची प्राथमिक लक्षणे असू शकतात. .

महिलेमध्ये श्वासासंदर्भात अडचण नाही, डोळ्यांचा आजार प्रमुख लक्षण
संशोधकांनी नमूद केले की, अल्बर्टा येथील रॉयल अलेक्झांड्रा हॉस्पिटल ऑप्थल्मोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये एक 29 वर्षीय महिला गंभीर कंजक्टिव्हस आणि श्वास घेण्यास अडचण ही तक्रारी घेऊन आली. बर्‍याच दिवसांच्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली. ते म्हणाले की, या दरम्यान ही महिला नुकतीच आशियातून परतल्याची माहिती मिळाली. यावेळी, एका निवासी डॉक्टरने तिची कोरोना चाचणी केली ज्यात तिला या विषाणूची लागण झाल्याचे आढळले.

कॅनडाच्या अल्बर्टा विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक कोर्लोस सोलार्टे म्हणाले कि, “या प्रकरणात आश्चर्याची बाब म्हणजे यामधील मुख्य लक्षण श्वास घेण्यास अडचण नव्हते तर डोळ्यांचा आजार होता. त्या महिलेला ताप, खोकला नव्हता, म्हणून सुरुवातीला आम्हाला तिला कोविड – 19 संसर्ग असल्याची शंका नव्हती,” संशोधकांनी सांगितले की, या अभ्यासामुळे लोकांना आरोग्यासाठी महत्वाची नवीन माहिती मिळाली, तसेच यामुळे नेत्रतज्ज्ञांच्या डोळ्यांची तपासणी आणखी गुंतागुंतीची झाली आहे. सोलार्टे म्हणाले, ‘या प्रकरणात शेवटी रुग्ण बरा झाला. परंतु त्याच्या संपर्कात असणारे बरेच निवासी डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. “सुदैवाने यापैकी कोणालाही कोरोना विषाणूची लागण झालेली आढळली नाही.

कोरोनामुळे जगात आतापर्यंत 470,703 लोकांचा मृत्यू

कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. या साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 470,703 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 9,046,080 लोकांना आजाराने ग्रासले आहे. अद्याप कोरोना विषाणूवर कोणताही कायमचा इलाज मिळालेला नाही. जगभरातील शास्त्रज्ञ तो शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. बऱ्याच औषधांवर चाचणी सुरू आहे आणि यासाठी लवकरच औषध किंवा लस विकसित होईल अशी अपेक्षा आहे.

भारतात कोरोनामुळे 13,703 लोकांचा मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सर्व प्रयत्न सुरु असूनही कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. या दरम्यान, सोमवारी देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14 हजार, 821 प्रकरणे समोर आली, तर 445 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 लाख, 25 हजार, 282 वर पोहोचली आहे. त्यात 2 लाख, 37 हजार, 196 रुग्ण बरे झाले आहेत.यासह सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या एक लाख, 74 हजार 387 आहे. त्याच बरोबर आतापर्यंत 13703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.