100 दिवसांपासून ‘या’ देशात ‘कोरोना’ची एकही केस नाही, तरी सुद्धा ‘इशारा’

न्यूझीलँड : मागील 100 दिवसात न्यूझीलँडमध्ये कोरोनाची एकसुद्धा केस समोर आलेली नाही. मात्र, नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे, अन्यथा व्हिएतनाम किंवा ऑस्ट्रेलियासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.

व्हायरसवर वेळेत नियंत्रण मिळवणार्‍या सुमारे 50 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाचे खुप कौतूक होत आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचे सुद्धा लोक कौतूक करत आहेत. न्यूझीलँडला सध्या जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानले जात आहे.

न्यूझीलँडमध्ये मागील 100 दिवसात कोरोनाची एक सुद्धा केस समोर आलेली नाही. मात्र, नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे, अन्यथा व्हिएतनाम किंवा ऑस्ट्रेलियासारख्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

न्यूझीलँडच्या अधिकार्‍यांना कोरोनाबाबत अजूनही चिंता वाटत आहे, कारण लोकांनी आता सामान्य जीवन जगण्यास सुरूवात केली आहे आणि ते टेस्ट करण्यास सुद्धा नकार देत आहेत. अनेक लोक सरकारकडून जारी ट्रेसिंग अ‍ॅपचा सुद्धा वापर करणे टाळत आहेत. हायजीनची सुद्धा काळजी घेताना दिसत नाहीत.

येत्या दिवसात कोरोना व्हायरस पसरण्याच्या स्थितीसाठी न्यूझीलँड स्वताला तयार करत आहे. जेणेकरून व्हायरस पसरल्यास वेळेत योग्य पावले उचलता येतील. न्यूझीलँडमध्ये आतापर्यंत एकुण 1219 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तर, सध्या आयसोलेशन सेंटरमध्ये 23 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. या केस अन्य देशांतून आलेल्या लोकांशी संबंधित आहेत.